मानव अधिकारांना समर्पित जगातील पहिले टीव्ही चॅनेल

​🔹​​मानव अधिकारांना समर्पित जगातील पहिले टीव्ही चॅनेल

इंटरनॅशनल ऑब्जर्वेटरी ऑफ ह्यूमन राइट्स (IOHR) या संस्थेने लंडनमध्ये मानव अधिकारांना समर्पित जगातील पहिले टीव्ही चॅनेल सुरु केले. हे वेब-आधारित चॅनेल असेल. ते युरोप, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्वसह 20 देशांच्या प्रेक्षकांसाठी मानवाधिकारांशी संबंधित समस्यांवरील कार्यक्रम प्रसारित करेल.

या चॅनेलचे प्रसारण Netgem.tv प्लॅटफॉर्मद्वारे पाहिले जाऊ शकते. सध्या या चॅनेलचे कार्यक्रम इंग्रजीमध्ये प्रसारित केले जात आहेत, भविष्यात हे कार्यक्रम फारसी, तुर्की, अरबी आणि रशियन भाषांमध्येही प्रसारित केला जाऊ शकतो.

मुख्य प्रसार माध्यमांनी दुर्लक्षित केलेल्या मानवी हक्कांच्या कथा प्रेक्षकांच्या समोर घेऊन येणे, हा या चॅनेलचा उद्देश आहे. हे चॅनेल शरणार्थी, पत्रकारिता स्वातंत्र्य, दहशतवाद, महिला अधिकार, एलजीबीटी इत्यादी मुद्द्यांवर कार्यक्रम प्रसारित करेल.

▪️IOHR या संस्थेबाबत :

 इंटरनॅशनल ऑब्जर्वेटरी ऑफ ह्यूमन राइट्स (IOHR) ही एक स्वतंत्र, गैर-लाभकारी आणि गैर-सरकारी संस्था आहे.

 ही संस्था स्थानिक मानवाधिकार संस्थांच्या सहकार्याने सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी व मानवाधिकारांच्या सरंक्षणासाठी प्रयत्न करते.

अन्यायाने तुरुंगात डांबलेले पत्रकार, मानवाधिकारांचे समर्थक, शरणार्थी आणि शोषणाचे बळी ठरलेले लोक ज्यांच्याकडून मुलभूत हक्कांचे हिरावून घेतले आहेत, अशा लोकांच्या प्रतिष्ठेच्या रक्षणाचे काम ही संस्था करते.
---------------------------------------------------------
---------------------------------------------------------

Comments