महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना

महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना

स्वरुप :- राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन ही योजना राज्य शासना मार्फत सन- १९५४-५५ पासून राबविण्यात येते.

अटी व शर्ती :-
१. साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे अशी व्यक्ती
२. कला व वाड.मय क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्ष इतक्या प्रदिर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे अशी व्यक्ती
३. ज्या स्त्री / पुरष कलाकाराचे वय ५० पेक्षा जास्त आहे अशी व्यक्ती
४. साहित्यिक व कलावंत यांच्य निधनानंतर त्यांच्या विधवा पत्नी / वधुर पती यांना त हयात मानधन मिळेल.
५. जे साहित्यिक व कलावंत अर्धांगवायू / क्षय /कर्करोग / कृष्ठरोग या रोगांनी आजारी असतील तसेच ज्यांना ४० % पेक्षा जास्त शारिरीक व्यंग असेल किवा अपघाताने ४० % पेक्षा जास्त अपंगत्व आले असेल व त्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय करु शकत नसतील असे साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी वयाची अट शिथील करण्यात येईल.
६. वयाने वडील असणा-या व विधवा / परीतक्त्या वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात येईल.
७. ज्या साहित्यिक व कलावंताचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न मिळून ४८,०००/- पेक्षा जास्त नाही.

निवड समिती :- प्रत्येक जिल्हयासाठी या योजनेतंर्गत मानधनासाठी साहित्यिक व कलावंत यांना पात्र ठरविण्यासाठी जिल्हास्तरीय निवड समिती गठीत करण्यात येईल. जिल्हा निवड समितीने प्रत्येक आर्थिक वर्षी बैठक घेणे व त्याचप्रमाणे बैठकीत छाननी अंती निकषांची पुर्तता करणा-या पात्र अर्जामधून इष्टांकानुसार ६० साहित्यिक व कलावंत यांची निवड बंधनकारक राहिल.
मानधन स्वरुप :-
अ (राष्ट्रीय कलावंत)रु.२,१००/-रु.२५,२००/
ब (राज्यस्तरीय कलावंत )रु.१,८००/रु.२१,६००/
क (स्थानिक कलावंत)रु.१,५००/रु. १८,०००/

Comments