आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य
उदिष्ट :- अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व विमुक्त जाती, भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिदू, जैन लिगायत, बौध्द, शिख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास त्यास आंतरजातीय विवाह संबोधण्यात येते. शासन निर्णय दि.०६ ऑगस्ट,२००४ अन्वये मागासवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गातील विवाहीतांना सदर योजना लागू करण्यात आली आहे.
स्वरुप :- शासन निर्णय परिपत्रक दिनांक- १५ मार्च, १९९६ च्या अन्वये ३१ जानेवारी, २०१० पर्यतच्या ज्या आंतरजातीय विवाहीत दांपत्यास विवाह झालेला आहे अशा दांपत्यास प्रोत्साहनपर म्हणून रु.७०००/- धनाकर्ष, रु.७५००/- बचत प्रमाणपत्र, रु.४००/- संसारपयोगी वस्तु व रु.१००/- सत्कार समारंभ असे एकूण रु.१५,०००/- अर्थसहाय्य देय आहे व सुधारित शासन निर्णय दि. ०१ फेब्रुवारी,२०१० नुसार सदर दिनांकापासून पुढील आंतरजातीय विवाहीत झालेल्या दांपत्यास प्रोत्साहनपर रु.५०,०००/- अर्थसहाय्याचा धनाकर्ष पती पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदाने करण्यात येतो
Comments
Post a Comment