अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे


अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे


उद्देश :- अपंगाचे शारीरिक पुनर्वसन करणे.

निकष :-
१. अपंग व्यक्तीचे दरमहा उत्पन्न रु.२,०००/- पेक्षा कमी असावे.
२. अपंग व्यक्तिचे किमान ४० वा त्यापेक्षा जास्त टक्कयांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे.
३.महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
४. उपकरणाची / साधनाची आवश्यता असल्याचे तज्ञांचे शिफारस पत्र असावेत.

लाभाचे स्वरुप :- अस्थिव्यंग अपंग व्यक्तींना तीनचाकी सायकल, कृत्रिम अवयव, कुबडया, कॅलिपर्स इत्यादी साधने तसेच अंध व्यक्तींना चष्मे, काठया इयत्ता १० पुढील व्यक्तींना शिक्षणासाठी टेपरेकॉर्डर कर्णबंधीरांसाठी वैयक्तिक श्रवणयंत्र इत्यादी साधनासाठी रु.३,०००/- पर्यतचे अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देणे.

संपर्क:- महाराष्ट्र राज्य, अपंग वित्त व विकास महामंडळ,मुंबई जिल्हा कार्यालय- सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, नाशिक -पुणे रोड,नाशिक.

Comments