मुख्यमंत्री शिशु स्वागत किट योजना

मुख्यमंत्री शिशु स्वागत किट योजना

बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात जन्मणाऱ्या नवजात बालकांना आता राज्य शासनामार्फत मिळणार मुख्यमंत्री शिशु स्वागत किट.

प्रजासत्ताक दिनापासून राज्यात राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री शिशु स्वागत किट योजनेचा महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ.

शासकीय रुग्णालयात होणाऱ्या कोणत्याही महिलेच्या पहिल्या प्रसुतीच्यावेळी मुलांच्या संगोपनासाठी हे किट मिळणार मोफत.

महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते गरोदर महिला आणि स्तनदा मातांना मुख्यमंत्री शिशु स्वागत किटचे वाटप. सचिव विनिता सिंगल, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त इंद्रा मालो उपस्थित.

मुख्यमंत्री शिशु स्वागत किटमध्ये काय असेल?

लहान मुलांचे कपडे
लंगोट
गादी
टॉवेल
थर्मामिटर
तेल
मच्छरदाणी
गरम ब्लँकेट
चटई
शॅम्पो
खेळणी,खुळखुळा,
लहान नेलकटर
मुलासाठी हातमोजे-पायमोजे,
आईसाठी हात धुण्याचे लिक्विड
मुलाला गुंडाळून ठेवण्यासाठी कापड
आईसाठी लोकरीचे कापड
बॉडी वॉश लिक्विड

Comments