स्वयंरोजगारासाठी अपंग व्यक्तींना वित्तीय सहाय्य (बीजभांडवल)

स्वयंरोजगारासाठी अपंग व्यक्तींना वित्तीय सहाय्य (बीजभांडवल)

उदिष्ट :- अपंग व्यक्तिना लघू उद्योगासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन देणे.( सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक- अपंग २००८/ प्र.क्र.२१२/सुधार-३/ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई दिनांक- २ जुलै,२०१० अन्वये)

निकष :-
१. सदर योजनेसाठी अर्जदाराचे वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे आहे.
२. सदर योजनेसाठी शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षणाची अट नाही.
३. अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिकृत रहिवाशी असला पाहिजे.
४. वार्षिक उत्पन्न रु.१.०० लाखापेक्षा कमी असावे.
५. जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील/त्रिसदसीय समितीचे वैद्यकीय प्रमाणपत्र
६.अपंग व्यक्ती हा बेरोजगार असावा.
७. ज्या व्यवसायासाठी प्रस्ताव सादर करावयाचा आहे. त्या व्यवसायाचे व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र/दरपत्रक (कोटेशन)/ प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक.

लाभाचे स्वरुप :- रु.१.५० लाखापर्यतच्या व्यवसायाकरीता ८० * बॅकेमार्फत कर्ज व २० * अथवा कमाल मर्यादा ३०,०००/- सबसिडी स्वरुपात अर्थसहाय्य.

Comments