मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना सहाय्यक अनुदान
स्वंयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना सहाय्यक अनुदान
उदिष्ट :- मागासवर्गीय विद्यार्थ्याना त्यांचा शिक्षणक्रम पूर्ण करता यावा ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यामध्ये शाळा गळतीचे प्रमाणकमी व्हावे आर्थिक दुरवस्थेमुळे मागासवर्गीय पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी येऊ नये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने ही योजना सन- १९५०-५१ पासून कार्यन्वित करण्यात आलेली आहे.
स्वरुप:-
१. कर्मचारी मानधन - वसतिगृह अधिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस व चौकीदार यांना एकत्रित मानधन देण्यात येते.
२. परिपोषण अनुदान- प्रतिविद्यार्थी प्रतिमहा रु.९००/- प्रमाणे १० महिन्याकरीता शासनाकडून निवासी विद्यार्थ्यासाठी परिपोषण अनुदान देण्यात येते.
३. इमारत भाडे- इमारत भाडयापोटी सार्वजनिक बांधकाम विभागने प्रमाणित केलेल्या भाडयाच्या ७५ % भाडे संस्थेस देण्यात येते.
४. सोयी सुविधा- निवास,भोजन, अथंरुण, पाघरुण, क्रिडा साहित्य इत्यादी सोयी सुविधा मोफत देण्यात येतात.
५. वसतिगृह प्रवेश- अनुदानित वसतिगृहांमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याबरोबरच मांग,वाल्मिकी, कातकरी व माडीया गोंड या प्रवर्गातील स्थानिक विद्यार्थ्याना आणि अपंग व निराश्रीत विद्यार्थ्याना प्राधान्याने विहित टक्केवारीच्या अधिन राहून प्रवेश देण्यात येतो.
Comments
Post a Comment