अपंग- अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्याहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना

अपंग- अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्याहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना

उद्देश :- समाजातील अपंगत्व असलेल्या व्यक्तीना सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपले कौटोबिक जीवन व्यतीत करता यावे साठी अपंग व अपंगत्व नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्रोत्याहन दिल्यास निश्चिम पणे अपंग व्यक्तींशी अपंगत्व नसलेल्या व्यक्ती विवाह करण्यास प्रोत्याहित होतात. याकरीता राज्यात आंतरजातीय विवाहाच्या धरतीवर अपंग व अपंगव्यक्तीच्या विवाहास प्रोत्याहन देणे.

सदर योजनेच्या अटी व शर्ती :-
१. वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियप्रमाणे किमान ४०* अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे सक्षम प्राधिका-याने दिलेले प्रमाणपत्र असावे.
२. अपंग वधू अथवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
३. विवाहीत वधू व वराचा प्रथम विवाह असावा. वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी.
४.विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा.
५.विवाह झाल्यानंतर किमान एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

लाभाचे स्वरुप :-
१. रक्कम रु. २५,०००/- चे बचत प्रमाणपत्र
२. रु. २०,०००/- रोख स्वरुपात.
३. रु.४,५००/- संसारपयोगी साहित्य व वस्तु खरेदीसाठी.
४. रु.५००/- स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी असे एकूण रु.५०,०००/-

Comments